सोनाली कुलकर्णी आता करतेय निर्मिती क्षेत्रात प्रवेश, केली ‘हकामारी’ या वेब सिनेमाची घोषणा

Sonalee Kulkarni Announce Regional Web Film Hakamari

आपल्या अभिनय आणि नृत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे. नुकतीच तिने सोशिअल मीडियावर याची घोषणा केली.

आपल्या इन्स्टाग्राम वर सोनाली म्हणतीये.

 

गेली १४ वर्षें मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय करत असताना तुम्ही माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला.
मी वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तुम्ही कायम सकारात्मक प्रतिसाद आणि उर्जा देत राहिलात.
त्याच्याच बळावर आणखी एक धाडसी पाऊल उचलते आहे.
आशा आहे की या नवीन प्रवासात देखील तुमची अशीच खंबीर साथ मिळेल.

 

या सिनेमाचं दिग्दर्शन समीर विध्वंस करणार आहेत. लव्हस्टोरी मध्ये स्पेशीएलिटी असलेले समीर विध्वंस हा भयपट देखील तेवढ्याच ताकतीने आपल्या प्रेक्षकांसमोर उभा करतील यात शंका नाही.

सोनाली सोबत तिचा धाकट्या भाऊ अतुल कुलकर्णी आणि अमोल भगत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

सिनेमाची कथा हृषीकेश गुप्ते यांनी लिहली आहे. सिनेमा कधी प्रदर्शित होईल याची काही माहिती अजून जाहीर केली नसली तरी मराठीतील पहिली OTT वाहिनी म्हणजेच प्लेनेल मराठी  वर प्रदर्शित होईल हे नक्की.

सिनेमा लवकरच आपल्या समोर येईल ही अपेक्षा ठेवुयात आणि आपल्या फिल्मीगीरी वाचकांच्या तर्फे सिनेमाला शुभेच्छा देऊयात

New Marathi Movies

Marathi Web Series

Marathi Comedy Movies