Jaggu Ani Juliet Marathi Movie | Reviews, Cast, Story

Jaggu Ani Juliet Marathi Movie

जग्गु आणि Juliet ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये

मुळशी पॅटर्न सिनेमाची निर्मिती करणारे ‘पुनीत बालन स्टुडिओज’ आता मराठी प्रेक्षकांसाठी नवा सिनेमा घेऊन येत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर महेश लिमये करणार आहेत.

‘जग्गु आणि Juliet’ च्या पोस्टर मध्ये कुणीतरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहे. त्याला लंडनच्या बिग बेनची पार्श्वभूमी लाभलेली आहे. अतिशय आकर्षक मांडणीमुळे लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या सिनेमाचं कथा लेखन महेश लिमये यांनीच केलं असून त्यामध्ये त्यांना गणेश पंडित आणि अंबर हडप यांनी संवाद लिहून साथ दिली आहे. या शिवाय या सिनेमाला संगीत देणार आहेत, मराठीतील आघाडीचे संगीतकार ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या संगीतातील जादूने छाप पाडली असे महाराष्ट्राची लाडकी संगीतकार जोडी अजय-अतुल.

सिनेमाचं ९० टक्के चित्रीकरण हे युरोपमध्ये झालं आहे. त्यामुळे सिनेमातील लोकेशन्स नयनरम्य असतील यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि त्यातच एक प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर जर सिनेमाचं दिग्दर्शन करत असेल तर सोने पे सुहागाच म्हणावं लागेल.

सिनेमात कोण कोण कलाकार आहेत हे अजून जाहीर केलं गेलं नाही. परंतु आपल्याला ते लवकरच कळेल अशी आशा धरूयात आणि ‘जग्गु आणि Juliet’ या सिनेमाच्या टीमला फिल्मीगिरी टीम तर्फे शुभेच्छा देऊयात

Jaggu Ani Juliet Movie Cast-

Cast:

Music Director: Ajay – Atul

Produced By: Punit Balan 

Directed By: Mahesh Limaye

Written By: Ganesh Pandit, Ambar Hadap

Jaggu Ani Juliet Release Date

Movie releases in 2021