महेश मांजरेकर म्हंटल की प्रेक्षकांना नवीन काहीतरी हमखास पाहायला मिळणार याची शाश्वतीच. अशीच एक महेश मांजरेकर यांची वेबसिरीज म्हणजे काळे धंदे. एक तरुण फोटोग्राफर विकीच्या आयुष्याभोवती फिरणारे कथानक. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना. त्यामधून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु त्यामधून बाहेर पडण्याऐवजी त्यात अजून अडकत जाणे हे विनोदी अंगाने दर्शवण्याचा दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेबसिरीज मध्ये अनेक बोल्ड दृश्य आणि संवाद आहेत.
या वेबसिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत शुभंकर तावडे आहेत. मराठीतील एक नामवंत विनोदी कलाकार सुनील तावडे यांचे हे सुपुत्र. विशेष म्हणजे सुनील तावडे यांनीच या वेबसिरीज मध्ये शुभंकर यांच्या वडिलांची भूमिका केली आहे. या शिवाय महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, नेहा खान, निखिल रत्नपारखी यांच्याही या काळे धंदे वेबसिरीज मध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.
एकूण ८ भागांची ही वेबसिरीज तुम्ही झी5 वर पाहू शकता. अर्थात बोल्ड संवाद आणि काही बोल्ड दृश्य असल्या कारणाने लहान मुलांसोबत ही वेबसिरीज पाहू नका