OMG Marathi Movie (ओह माय घोस्ट) | Reviews, Cast, Story

OMG Marathi Movie

प्रथमेश परबचा नव्या वर्षातील नवा सिनेमा - ओह माय घोस्ट (OMG)

हिंदी मधील OMG हा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा सिनेमा आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. तर याच नावाशी थोडं साधर्म्य असलेला एक नवा सिनेमा मराठीमध्ये येत आहे. सिनेमाचं नाव आहे OMG म्हणजेच ‘ओह माय घोस्ट’.

सिनेमामध्ये टाईमपास सिनेमा फेम सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब हा प्रमुख भूमिकेत आहे. तर प्रथमेश सोबत या सिनेमात कुरुष देबु, पंकज विष्णू, काजल शर्मा हे कलाकार देखील अभिनय करताना दिसतील.

सिनेमाची कथा एका अनाथ मुलगा जग्गु याच्या भोवती फिरणारी आहे. जो एका भुतांच्या घरात फसतो. असं प्रथम दर्शनी तरी समजते. जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि फिलमोशन पिक्चर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर वसीम खान हे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

हा सिनेमा १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. आपण आपल्या फिल्मीगिरी तर्फे ओह माय घोस्ट या सिनेमाला शुभेच्छा देऊयात.

OMG Marathi Movie Cast-

Cast: Prathamesh Parab, Pankaj Vishnu, Deepali Patil, Kurush Deboo, Apurva Deshpande

Writer: Mohsin Chavada

Directed By: Wasim Khan

Produced By: Sana Khan, Rohandeep Singh

Music Director: Rohit Raut

OMG Marathi Release Date

Movie releases in 12 February 2021