Sarsenapati Hambirrao Marathi Movie | Reviews, Cast, Story

Sarsenapati Hambirrao Marathi Movie

प्रवीण तरडे यांचा नवा सिनेमा - सरसेनापती हंबीरराव मोहिते

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित एक नवा कोरा सिनेमा येत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की स्वराज्य निर्मितीसाठी हंबीरराव मोहिते यांच योगदान किती अतुल्य आहे.

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच निधन झाल्यानंतर निर्माण झालेल्या दुफळी नंतर सक्का भाचा असलेले छत्रपती राजाराम महाराज यांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांना गादी मिळवून देण्यात सगळ्यात मोठा वाटा हा हंबीरराव मोहिते यांचा होता.

या सिनेमाचं दिग्दर्शन देऊळबंद आणि मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शना सोबतच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन या जबाबदाऱ्या देखील प्रवीण तरडे यांनी या सिनेमात उचलल्या आहेत.

चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, आणि संदीप मोहिते पाटील हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ अशी आकर्षक टॅग लाईन देऊन या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यात हंबीरराव मोहिते यांची भूमिका करणारा कलाकार बलदंड देहयष्टी असलेला पाठमोरा उभा आहे. ही सरसेनापती यांची भूमिका प्रवीण तरडे यांनीच केली असण्याची दाट शक्यता आहे.

या सिनेमात अजून कोण कोण कलाकार आहेत हे अजून समजले नाही. सिनेमाची तारीख देखील अजून जाहीर करण्यात आली नसली तरी लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येईल अशी आशा करूयात. आणि हरहुन्नरी कलाकार प्रवीण तरडे यांना त्यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमासाठी शुभेच्छा देऊयात.

Sarsenapati Hambirrao Movie Cast-

Cast:

Gashmeer Mahajani, Shubhankar Ekbote, Ramesh Pardeshi, Pravin Tarde, Raqesh Bapat, Shruti Marathe

Produced By:

Sandeep Mohite Patil, Saujanya Nikam, Dharmendra Bora

Directed By:

Pravin Tarde

Sarsenapati Hambirrao Release Date

Movie releases in 2021