हिरकणीची (Hirkani) कथा तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वाडीतील धनगरणीची गोष्ट. दूध विकायला रोज रायगडावर जाणाऱ्या हिराला एका संध्याकाळी उशीर होतो. ती गडावरून बाहेर पडण्याच्या आधीच सूर्यास्त झाल्याने गडाचा मुख्य दरवाजा बंद केला जातो. एकदा दरवाजा बंद झाला, की तो उघडायचा नाही, अशी महाराजांची आज्ञा. अशात हिरा गडावर अडकते. तिला राजांचा नियम ठाऊक असतो. तरीही ती गडकऱ्यांना दरवाजा उघडण्याची विनंती करते. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. गडकरी एक रात्र गडावरील धर्मशाळेत मुक्काम करायचा सल्ला तिला देतात. पण तीच लहान बाळ घरी असत. कुणी तरी तिला म्हणतं, 'जा पश्चिमेचा कडा मोकळा आहे, तिकडून उतरून जा' आणि ती खरंच पश्चिमेचा कडा उतरायला निघते.
तिने कडा उतरायला सुरुवात करण्यापासून ते कडा उतरून ती बाळापर्यंत पोहोचण्याचा काळ हा खरा नाट्यमय काळ या सिनेमात दर्शवण्यात आला आहे.
सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर यांनी अभिनय केलेल्या या सिनेमाच दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे.
प्राईम व्हिडिओ वर सहकुटुंब या सिनेमाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.