काही दिवसांपूर्वी आपण आपल्या फिल्मीगीरीच्या वाचकांना मराठीत आदित्य सरपोतदार दिग्दर्शित येणाऱ्या नवीन सिनेमा बद्दल म्हणजेच 'झोंबिवली' बद्दल माहिती दिली होती. या नवीन विषयावर आपला मराठी सिनेमा कसा बनतो या विषयी उत्सुकता होती. नुकताच प्रदर्शित झालेला या सिनेमाचा टिझर पाहून ही उत्सुकता अजून शिगेला पोहोचली आहे. हा टिझर पाहून एवढेच म्हणता येईल की अत्यंत उत्कृष्ट आणि हॉलीवूडच्या तोडीचा टिझर झाला आहे. सिनेमा देखील तेवढाच छान आणि रोमांचक होईल असा अंदाज आपण सहज बांधू शकू.
आजवर मराठीमध्ये या विषयावर कोणी सिनेमा बनवण्याचं धारिष्ट्य केलं नव्हतं. ते शिवधनुष्य आदित्य सरपोतदार यांनी उचललं आहे. एक गाजलेला कोरियन सिनेमा 'ट्रेन टू बुसान' आणि हिंदी मधील 'गो गोवा गोन' या सिनेमातून हे प्रयोग झाले होते.
दीड मिनिटांच्या या टिझर मध्ये अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत अमेय वाघ पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना झोंबी बद्दल माहिती देत आहे. तर दुसरीकडे एका हॉस्पिटलमध्ये ललित प्रभाकर झोंबीसोबत मुकाबला करत आहे, हे दृश्य आहे.
३० एप्रिल ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, तेव्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा अवश्य पहा