Panghrun Marathi Movie | Reviews, Cast, Story

Panghrun Poster

महेश मांजरेकर यांच्या मुलीचा नवा सिनेमा - पांघरूण

बॉलीवूड प्रमाणे आता मराठी सिनेसृष्टीत देखील आपल्या मुलांना सिनेमात लाँच करण्याचा ट्रेंड चालू होताना दिसत आहे. यातच आता भर पडली आहे ती मराठीतील प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर हे आपल्या लेकीला गौरी इंगवले हिला आपल्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. तसं पाहायला गेलं तर गौरी इंगवले हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी नवे नाही. गौरी ने या आधी देखील सिनेमा आणि नाटकात काम केले आहे. त्यामुळे हे क्षेत्र जरी तिच्यासाठी नवे नसले तरी आधीच्या सिनेमात तीने बालकलाकार म्हणून छोटेखानी भूमिका केल्या होत्या. पण आगामी पांघरूण या सिनेमात तिची भूमिका ही मध्यवर्ती असेल. हेच या सिनेमाचा ट्रेलर पाहून दिसत आहे.

या आधी गौरी आपल्याला कुटुंब या झी च्या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. या मध्ये तिच्या सोबत जितेंद्र जोशी, सिध्दार्थ जाधव, वीणा जामकर हे कलाकार होते. या व्यतिरिक्त २०१५ साली आलेला ३.५६ किल्लारी या किल्लारी भूकंपावर आधारित सिनेमात देखील काम केले आहे.

गौरी ने सिनेमा सोबत नाटकात देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ओवी या नाटकात ती हेमांगी कवी या अभिनेत्री सोबत दिसली होती. शिवाय लहान असताना तिने एक रिऍलिटी शो मध्ये देखील भाग घेतला होता. चक धूमधूम हे या रियालिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता.
गौरी अभिनयासोबतच नृत्य देखील उत्तम करते. तिच्या नृत्याची चुणूक तिने कुटुंब सिनेमात दाखवली आहेच. ती भरतनाट्यम शिकली आहे.

आगामी पांघरूण सिनेमात तिने एका विधवेचे भूमिका केली आहे. बाकी सिनेमाच्या कथे संदर्भात काही माहिती मिळाली नसून, काय कथा असेल याबाबतीत उत्सुकता आहे. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आधी ही तारीख ३ एप्रिल २०२० होती. नवीन तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही.

महेश मांजरेकर यांच्या मुलीचं प्रेक्षकांकडून दणक्यात स्वागत व्हावं ही आशा ठेऊन आपण महेश मांजरेकर आणि त्यांची लेक गौरी दोघांनाही आगामी चित्रपट पांघरूण ला शुभेच्छा देऊयात.

Panghrun Movie Cast-

Cast:

Gauri Ingwale, Amol Bawdekar, Rohit Phalke, Pravin Tarde & Prabhakar More

Production House:

Mahesh Manjrekar Films

Produced By:

Zee Studios

Directed By:

Mahesh Manjrekar

Panghrun Release Date

Movie releases in 2021