2019 साली कागर चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारा शुभंकर तावडे सध्या चर्चचा विषय ठरला आहे, कागर चित्रपटसाठी त्याला गौरोविण्यात आला आहे. शुभंकर तावडेला ‘बेस्ट डेबूट फिल्मफेअर’ ह्या पुरस्काराने गौरविण्यात आल आहे.
आपल्या पहिल्याच मराठी सिनेमाला पुरस्कार मिळाल्याने शुभंकर भारावून गेला आहे. शुभंकरने एक वृत्तवाहिनी ला मुलखत देताना सांगितले की, फिल्मफेअर पुरस्कारची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा प्रत्येक अभिनेत्याचे ब्लॅक लेडी मिळवणे हे स्वप्न असते. परंतु खूप कमी लोक तिला मिळवू शकतात. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे त्याचा मला खूप आनंद होतोय,
शुभंकर पुढे म्हणाला , मला कागरचे दिग्दर्शक मकरंद माने ह्यांचे खूप आभार मानायचे आहेत कारण माझ्या सारख्या नवोदित कलाकाराला त्यांनी कागर सिनेमात संधी दिली. मी कागर सिनेमाचा हिरो बनू शकतो हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे मार्गदर्शनही मला सात्यत्याने मिळत गेलं म्हणून आज मी इथपर्यंत पोहचू शकलो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व रसिकप्रेक्षकांचे आभार ज्यांनी हा सिनेमा पाहून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
शुभंकरने मराठी सिरीयल ‘फ्रेशर” माधून पदार्पण केल होत, शिवाय मराठी वेबसिरीज ‘काळे धंदे’ मध्येही तो झळकला होता,
कागर सिनेमाला लोकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला होता. जर तुम्ही कागर चित्रपट बघितला नसेल तर तुम्ही तो नेटफ्लिक्स वर बघू शकतात.