‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका झी मराठीवर प्रचंड गाजली. बरेच दिवस ही मालिका TRP मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. पण आता नुकतीच काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद झाली. त्यामुळे या मालिकेतील प्रमुख कलाकार आता काय करणार या बाबत रसिकांच्या मनात उत्सुकता होती.
त्यातच दोन दिवसांपूर्वी सोनी मराठीवर ‘क्रिमिनलस् चाहूल गुन्हेगाराची’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. आणि या मालिकेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील गुरुनाथ म्हणजेच ‘अभिजित खांडकेकर’ हे करणार असल्याचे निदर्शनास आले.
खरं म्हणजे हिंदी वाहिन्यांवर सावधान इंडिया, पोलिस पेट्रोल, सारख्या मालिका तुफान हिट होत होत्या. तसे प्रयत्न मराठीमध्ये देखील पूर्वी काही प्रमाणात पाहायला मिळाले होते. परंतु बऱ्याच कालावधी मध्ये हा प्रयत्न केला गेला नव्हता. आता पुन्हा एकदा हा गुन्हेगारी विश्वातील थरार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्या सोबतच अनोळखी लोकांसोबत आपल्याला कोणकोणती सावधगिरी बाळगावी याचेही धडे आपल्याला मिळतील.
आपल्या नकारात्मक भूमिकेने छोटा पडदा गाजवणारे अभिजित खांडकेकर ही नवी जबाबदारी देखील तेवढीच व्यवस्थित पणे पार पडतील अश्या शुभेच्छा त्यांना देऊयात