आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक मालिका आपण पहिल्या आहेत. अनेक नायकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आता हे आव्हान अजून एक अभिनेता पेलवणार आहे. तो अभिनेता म्हणजे भूषण प्रधान.
या मालिकेत वेगळं काय असेल?
एकंदरीत वर सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या आयुष्यावर अनेक मालिका आल्या असल्याने या मालिकेत वेगळं असं काय पाहायला मिळणार? हा प्रश्न आपल्याला पडला असेलच. तर वाहिनीवर येणाऱ्या जाहिराती पाहून आपण एक अंदाज बांधू शकतो की आजवर आलेल्या सगळ्या मालिका या महाराजांना केंद्रस्थानी ठेवून बनवल्या गेल्या होत्या. पण ही मालिका महाराजांवर प्रेम करणाऱ्या. आणि त्यांच्यवर जीव ओवाळून टाकलेल्या अश्या त्याच्या पराक्रमी मावळ्यांना केंद्रस्थानी ठेवून बनवली गेली असावी.
मालिकेच्या जाहिरातीमध्ये आपल्याला तान्हाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या कर्तृत्वाची थोडीशी झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आपण या दोन मर्द मावळ्यांव्यतिरिक्त मालिकेमधून नेताजी पालकर,कोंढाजी फर्जंद, शिवा काशिद, जीवा महाला, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, या महाराजांच्या झुंजार मावळ्यांविषयी देखील आपल्याला माहिती मिळेल अशी आशा धरूयात. आणि महाराजांवरील इतर मालिकांच्या तुलनेत हेच या मालिकेचं वेगळेपण असेल
ही मालिका येत्या २६ जुलै पासून रात्री १० वाजता प्रदर्शित करण्यात येईल.