सोनी मराठीवर सायली देवधरची येतीये नवी मालिका – वैदेही
‘देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो!
वैदेही – शतजन्माचे आपुले नाते
लवकरच सोनी मराठीवर’
हा संदेश देऊन सोनी मराठीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘वैदेही’. मुख्य वैदेहीच्या भूमिकेत आहे सायली देवधर.
सायली देवधर ही अभिनेत्री आपल्याला या आधी देखील मराठी सिरिअल्स मध्ये अनेक वेळा दिसली आहे. तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या झी मराठीवरील मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर सोनी मराठी वरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत देखील तिने अभिनय केला होता.
सायली देवधर सोबत मालिकेत तृष्णा चांद्रतारे, आणि पल्लवी पाटील या दोन अभिनेत्री देखील आपल्याला अभिनय करताना दिसतील. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान या मालिकेचं प्रक्षेपण करण्यात येईल. नक्की वेळ काय असेल हे अजून सोनी मराठीने जाहीर केलं नाही. तरी मालिकेची वेळ आणि सायली देवधर सोबत कोण अभिनेता या मालिकेत काम करणार आहे या गोष्टी वाहिनी लवकरच जाहीर करेल अशी आशा धारूयात
Cast: Sayali Devdhar, Pallavi Patil, Trushna Chandratre