मराठीमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक घडामोडीवर आधारित सिनेमांची काही काळात निर्मिती करण्यात आली. मग ते फर्झन्द, हिरकणी पासून ते फतेशीकस्त पर्यंत तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ पावनखिंड’ हे असेच ऐतिहासिक येऊ घातलेले सिनेमे. या सिनेमांसोबत अजून एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘रावरंभा’. १६७४ साली महाराष्ट्रातील साताऱ्यामधील सह्याद्रीच्या कडेपऱ्यात घडणारी ही प्रेमकथा. सिनेमाचं स्लोगन देखील खूप आकर्षक आहे.
‘तलवारीच्या इतिहासात हरवून गेलेली बुलंद प्रेमाची अबोल कहाणी !
सिनेमाचं सगळं चित्रीकरण सातारा मध्ये झालं असून. सिनेमाचा टिझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
१७०७ मध्ये रावरंभा औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला केला होता. रावरंभा यांना निजामाने ‘रावरंभा’ ही पदवी दिल्याचं आढळतं. रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा असं त्याचा अर्थ होतो. त्यांचं मूळ नाव ‘रंभाची बाजी’ असं होतं
शशिकांत पवार यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, प्रतापराव गंगावणे यांनी या सिनेमाचं लेखन केले आहे. सिनेमातील कलाकारांची नावे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवली आहेत.
आपण आपल्या फिल्मीगीरी च्या वाचकांच्या तर्फे रावरंभा सिनेमाला शुभेच्छा देऊयात.
Ravrambha Release Date
Movie releases in 2021