Chandra Aahe Sakshila | Reviews, Cast, Story, Actors Real Name

Chandra Aahe Sakshila Marathi TV Serial

कलर्स मराठी वरील नव्या मालिकेत सुबोध भावे खलनायकाच्या भूमिकेत ?

कलर्स मराठी वर काही दिवसांपासून प्रोमो सुरु असलेली ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेचा ११ नोव्हेंबर पासून शुभारंभ झाला. सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवर ही मालिका रात्री ८:३० वाजता पाहू शकता.

रहस्यमय मालिका लिहण्यात हातखंडा असलेला लेखक चिन्मय मांडलेकर याने या मालिकेच लेखन केलं आहे. या आधी देखील चिन्मय मांडलेकर याने ‘असंभव’ ‘गुंतता हृदय हे’ या सारख्या दर्जेदार रहस्यमय मालिका लिहल्या आहेत.

मुळाक्षर प्रोड्यकॅशन निर्मित या मालिकेचा ट्रेलर पाहून सुबोध भावे या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत आहे हा अंदाज आपण बांधू शकतो. सुबोध भावे यांनी या आधी देखील ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वरील लोकप्रिय मालिके मध्ये विक्रांत सरंजामे ही खलनायकाची भूमिका केली होती. जी खूप गाजली होती. आता परत एकदा सुबोध भावे खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील असे वाटते.

शिवाय झी मराठीतील ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ऋतूजा बागवे ही देखील ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहे. स्वाती आणि श्रीधर या दोघांच्या हळव्या प्रेमावर आधारित ही मालिका लवकरच प्रेक्षकांच मन जिंकेल यामध्ये दुमत नाही.

Chandra Aahe Sakshila –

  • Serial Name: Chandra Aahe Sakshila | चंद्र आहे साक्षीला
  • Channel Name: Colors Marathi
  • Starting Date: 11 November 2020
  • Time: Mon-Fri 8:30 PM

Chandra Aahe Sakshila Cast –

  • Subodh Bhave (Shridhar Kale)
  • Rutuja Bagwe (Swati)

Written By:

Chinmay Mandlekar

Marathi TV Serial

Marathi Web Series

Marathi Comedy Movies