Sang Tu Ahes Ka | Reviews, Cast, Story, Actors Real Name

Sang Tu Ahes Ka Marathi TV Serial

स्टार प्रवाह वर डिसेंबर मध्ये येतेय सिध्दार्थ चांदेकरची नवी मालिका - सांग तू आहेस का ?

‘जिवलगा’ या मलिकेनंतर बराच कालावधी सिध्दार्थ चांदेकर चंदेरी दुनिया पासून दूर होता. पण आता आपल्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला तो लवकरच नवी मालिका घेऊन येत आहे. मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का ?’ ही मालिका एक प्रेमकथा आणि सोबतच एक भयपट देखील असेल.

स्टार प्रवाह नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका रसिकांसाठी घेऊन येत असते. ही मालिका देखील अश्याच वेगळ्या धाटणीची आहे. या मालिके बद्दल स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे सांगतात की ‘ एखादी मालिका रसिकांची उत्कंठा वाढवणारी असेल तर मग ती गोष्ट सांगायला अजून जास्त हुरूप येतो. सांग तू आहेस का ही मालिका देखील अशीच आहे. टप्याटप्यावर तुम्हाला प्रश्न पडतील आणि मालिकेसंदर्भात प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाईल.

या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर सोबत शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी हे नवे चेहरे देखील दिसणार आहेत. सांग तू आहेस का या मालिकेचं दिग्दर्शन दीपक नलावडे यांनी केलं असून विद्याधर पठारे यांनी मालिकेची निर्मिती केली आहे.

७ डिसेंबर पासून रोज रात्री १० वाजता स्टार प्रवाह वर ही मालिका प्रक्षेपित केली जाईल.

Sang Tu Ahes Ka –

  • Serial Name: Sang Tu Ahes Ka | सांग तू आहेस का
  • Channel Name: Star Pravah
  • Starting Date: 7 December 2020
  • Time: Mon-Fri 10:00 PM

Sang Tu Ahes Ka Cast –

  • Siddharth Chandekar (Swaraj)
  • Saaniya Chaudhari (Vaidahi)
  • Shivani Rangole

Marathi TV Serial

Marathi Web Series

Marathi Comedy Movies