Zombivali Marathi Movie | Reviews, Cast, Story

Zombivali Poster

झोंबिवली (२०२१) नवीन मराठी चित्रपट

२०२० हे वर्ष सर्वार्थाने सगळ्यांना वाईटच गेलं. या मध्ये सिनेमा देखील अपवाद नाही. पण आता सिनेमाचं क्षेत्र देखील उभारी घेऊ पाहतंय. आत्ता काही दिवसांपूर्वी नावाजलेले दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या नव्या कोऱ्या सिनेमाची घोषणा केली. २०२१ साली झोंबिवली नावाचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 

आदित्य सरपोतदार यांना मराठी मध्ये तश्या वेगळ्या ओळखीची गरज नाही फास्टर फेणे, क्लासमेट, माऊली, नारबाची वाडी, उलाढाल या एका पेक्षा एक सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. आनंदी गोपाळ स्माईल प्लिज या सारख्या सिनेमात काम केलेला ललित प्रभाकर, तरूणाईचा लाडका, दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ, आणि सिम्बा मध्ये रणवीर सिंग सोबत एका छोट्या भूमिकेत झळकलेली वैदेही परशुरामी असे तगडे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत.

मराठी मध्ये सहसा असा विषय घेऊन कोणी सिनेमा बनवत नाही तो विषय म्हणजे भयपट आणि विनोद याचं मिश्रण. तर अश्या भयपट आणि विनोद मिश्र पध्दतीचा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे विषयामध्ये नाविन्य तर आहेच शिवाय एक चांगला दिग्दर्शक अनेक चांगल्या कलाकारांसोबत हा सिनेमा करणार म्हणजे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना सिनेमागृहा पर्यंत खेचून आणेल यात शंका नाही.


झोंबिवली हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होत असला तरी तो किती तारखेला प्रदर्शित होणार आहे या बाबतीत आदित्य सरपोतदार यांनी कोणतही भाष्य केलं नाही. त्यामुळे आता ते चित्रपट प्रदर्शनाची तारीख किती ठरवतात ते पाहण्याजोगे ठरेल.