Godavari Marathi Movie | Reviews, Cast, Story

Godavari Marathi Movie Poster

जितेंद्र जोशीच चित्रपट निर्मिती मध्ये पाहिलं पाऊल - गोदावरी

आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी. चित्रपट, सूत्रसंचालन, वेबसरीज, नाटक यामध्ये चमक दाखवल्यानंतर आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवत आहे. नुकतीच त्याने सोशीअल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटासंदर्भात माहिती दिली. जीतूच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘गोदावरी’. तर गोदावरी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा निखिल महाजन हे सांभाळणार आहेत.

या चित्रपटाच्या निर्मिती सोबतच जितेंद्र जोशी या चित्रपटात अभिनय देखील करणार आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, संजय मोने, सखी गोखले यांच्या सारखे दिग्गज कलाकार आहेत.

निखिल महाजन यांनी या आधी २०१३ मध्ये गिरीश कुलकर्णी सोबत ‘पुणे ५२’ आणि आणि २०१५ साली श्रेयस तळपदे सोबत ‘बाजी’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करताना जितेंद्र जोशी ने आपल्या भावना प्रकट केल्या आणि सांगितले की १९९७ मध्ये मुंबईत आल्यावर या शहराने खूप काही दिले. बऱ्याच गोष्टी शिकवून शहाण केलं. आता मित्रांसोबत मिळून एक नवीन धाडस करत आहे. तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी असुद्यात

जितेंद्र जोशीच्या मित्रांनी त्याला या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे या बाबतीत कोणतीही कल्पना दिली गेली नाही. तसेच तो कधीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल याबाबतीत देखील कोणती स्पष्टता केली गेली नाही.
पण लवकरच आपल्याला हे कथानक नेमकं काय आहे हे कळेल ही आशा धरूयात आणि आपणही आपल्या लाडक्या अभिनेत्याला जितेंद्र जोशीला या त्याच्या नव्या पर्वा साठी शुभेच्छा देऊयात.

 

Godavari Movie Cast-

Cast:

Neeta Kulkarni, Jitendra Joshi, Priyadarshan Jadhav, Gauri Nalawade, Sakhee Gokhale & Sanjay Mone

Music Director:

AV Prafullachandra

Produced By:

Pavan Malu, Mitali Joshi & Nikhil Mahajan

Directed By:

Nikhil Mahajan

 

Godavari Release Date

Movie releases in 2021