Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Cast, Story, Actors Real Name

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Marathi TV Serial

झी मराठीवर येतेय शुभांगी गोखले यांची नवी मालिका - येऊ कशी कशी मी नांदायला

श्रीयुत गंगाधर टिपरे मधून घराघरात पोहोचलेली आपल्या सर्वांची लाडकी श्यामला म्हणजेचं जेष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले या आता नव्या भूमिकेतून आपल्या भेटीला येत आहेत.

झी मराठीवर नव्या वर्षात ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ ही मालिका सुरू होत आहे. ४ जानेवारी पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता ही मालिका आपल्याला झी मराठीवर पाहता येईल.

सासू सुनेच्या नेहमीच्या भांडणाला फाटा देऊन त्यांच्यातील प्रेम सादर करणारी ही मालिका असेल असे या मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमो वरून दिसतंय. या मालिकेमध्ये शुभांगी गोखले प्रेमळ सासूच्या भूमिकेत आहेत तर सूनबाईच्या भूमिकेत आहे ‘गर्ल्स’ या चित्रपटात दिसलेला चेहरा म्हणजे ‘अन्वीता फलटनकर’ ही अभिनेत्री.

ही मालिका रात्री ८ वाजता प्रदर्शित होणार असल्याने या आधी या ८ वाजता प्रदर्शित होणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं काय होणार हे पाहणं देखील औत्सुक्याच ठरेल. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल की नवीन वेळेत दाखवली जाईल हे थोड्याच दिवसात आपल्याला कळेल.
तूर्तास आपण ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेला आपल्या फिल्मीगिरी टीमतर्फे शुभेच्छा देऊयात

Yeu Kashi Tashi Mi Nandayla

  • TV Serial Name : Yeu Kashi Tashi Mi Nandayla | येऊ कशी कशी मी नांदायला
  • Channel : Zee Marathi
  • Starting Date: 4 January 2020
  • Show Time : Mon To Sat at 8 PM

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Cast-

Cast:

  • Shubhangi Gokhale
  • Anvita Phaltankar
  • Shalva Kinjawadekar

Marathi TV Serial

Marathi Web Series

Marathi Comedy Movies