Tarri (टर्री) Marathi Movie | Reviews, Cast, Story

Tarri Marathi Movie

ललित प्रभाकरचा नव्या वर्षात येतोय नवा सिनेमा - टर्री

‘आनंदी गोपाळ’ सिनेमातून लोकांच्या मनात आपली छाप सोडणारा अभिनेता ललित प्रभाकर नव्या वर्षात घेऊन येतोय एक नवा सिनेमा. या सिनेमाचं नाव आहे ‘टर्री’. ऑन युअर स्पॉट प्रोड्कॅशन आणि प्रिआमो एंटरटेनमेंट या प्रोड्कॅशन अंतर्गत प्रतीक चव्हाण, अक्षय पाटील, विक्रम धाकतोडे हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

सिनेमाचं दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे हे करत आहेत. सिनेमाचा टिझर नुकताच ललित प्रभाकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर प्रदर्शित केला आहे.

या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख किंवा सिनेमातील कलाकार यांच्या बद्दल जास्त माहिती त्यांनी दिली नाही. पण लवकरच या सिनेमा संदर्भात आपल्याला माहिती मिळेल आणि आपण फिल्मीगिरीच्या वाचकांना नव्या अपडेट देऊ.

तोपर्यंत टर्री या सिनेमाला भरभरून यश लाभो ही अपेक्षा ठेवून आपल्या फिल्मीगीरी च्या वाचकांतर्फे सिनेमाला शुभेच्छा देऊयात.

Tarri Movie Cast-

Cast: Lalit Prabhakar

Produced By: Pratik Chavan, Akshay Adhalrao Patil, Vikram Dhaktode

Directed By: Mahesh Ravsaheb Kale

Tarri Release Date

Movie releases in 2021