Special Marathi Movie| Reviews, Cast, Story

Special Marathi Movie

कृतांत फेम सुयोग गोऱ्हे आणि पायल काब्रे यांचा नवा सिनेमा - 'स्पेशल'

कृतांत आणि अशोक सराफ यांच्या सोबत शेंटीमेंटल या सिनेमात झळकलेला अभिनेता सुयोग गोऱ्हे आता एका नव्या सिनेमातून आपल्या समोर येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशिएल मीडिया वर प्रदर्शित झाले असून या सिनेमाचं नाव आहे ‘स्पेशल’. एकंदरीत सिनेमाचं पोस्टर पाहता हा सिनेमा भारतीय सैन्या बद्दल आधारित कथेवर असल्याचे अधोरेखित होते.

‘तू स्पेशल आहेस हे आधी तू स्वीकार कर मग दुनिया स्वीकार करेल’ अशी एक छान स्फूर्तीदायी टॅगलाईन या सिनेमाची आहे. या सिनेमात सुयोग सोबत पायल काब्रे ही अभिनेत्री आहे.

या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सचिन आंबट यांच्या खांद्यावर असेल. तर या सिनेमाच्या संगीताची धुरा प्रवीण कोळी, योगिता कोळी आणि अनय नाईक यांनी सांभाळली आहे.

सिनेमा प्रदर्शनाची तारीख अजून सांगितली नाही परंतु लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला चित्रपटगृहात येईल अशी आशा करूयात आणि आपल्या फिल्मीगिरी टीम तर्फे स्पेशल सिनेमाला शुभेच्छा देऊयात.

Special Movie Cast-

Cast: Suyog Gorhe,Payal Kabre

Written & Directed By: Sachin Ramchandra Ambat

Music By: Pravin Koli-Yogita Koli, Anay Naik

Production: Swapn Swaroop

Special Release Date

Movie releases in 2021