Manmauji Marathi Movie| Reviews, Cast, Story

Manmauji Marathi Movie

कॉमेडी किंग भाऊ कदम यांचा येतोय नवा सिनेमा - मनमौजी

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील आपल्या विनोदाच्या टायमिंग ने सगळ्यांना हासावणाऱ्या भाऊ कदम यांचा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. सिनेमाचं नाव आहे ‘मनमौजी’ सिनेमात भाऊ सोबत आपल्याला दिसतील मराठी मधील देखणा चेहरा भूषण पाटील आणि ‘काहे दिया परदेस’ मधील अभिनेत्री सायली संजीव.

हा सिनेमा शितल शेट्टी या दिग्दर्शित करणार असून त्यांनीच या सिनेमाचं लेखन देखील केलेलं आहे. तर विनोद मालेगवार हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच गुलाबजाम आणि लॉस्ट अँड फाउंड या सिनेमांची निर्मिती केलेली गोल्डन गेट मोशन पिक्चर ही संस्था या सिनेमाची देखील निर्मिती करत आहे.

भाऊ कदम यांच्या विनोदाने आणि भूषण आणि सायली या मराठीतील नव्या कोऱ्या जोडीने सिनेमाला चार चांद लागतील आणि सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा करूयात आणि या मनमौजी सिनेमाला आपल्या वाचक वर्गाकडून आणि फिल्मीगिरी टीम कडून शुभेच्छा देऊयात.

Manmauji Movie Cast-

Cast:

Bhau Kadam, Sayali Sanjeev, Ria Nalavade, Bhushan Nanasaheb Patil

Produced By: Vinod Malgewar

Written & Directed By: Sheetal Shetty

Music: Amitraj

Lyrics: Kshitij Patwardhan

DOP: Prasad Bhende

Manmauji Release Date

Movie releases in 2021