होणार सून मी या घरची’ ही झी मराठी वरील सुप्रसिद्ध मालिका आपल्याला आठवतच असेल. याच लोकप्रिय मालिकेतून श्री आणि जान्हवी म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची प्रेमकहाणी घराघरात पोहोचली.
तिथून नावारूपाला आलेला देखणा अभिनेता शशांक केतकर आता परत एकदा आपल्याला झी मराठी वरील एका नव्या कोऱ्या मालिकेतून भेटीला येईल. त्याने नुकताच सोसिएल मीडिया वरून आपल्या नव्या मालिकेचा टिजर प्रदर्शित केला.
या मालिकेचं नाव आहे ‘पाहिले मी तुला’. मराठी मधील एक सुप्रसिद्ध ‘गुपचूप गुपचूप’ या चित्रपटात अजित वाडेकर यांनी गायलेले हे गाणे आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जाते, याचं गाण्याच्या नावाने ही मालिका आहे.
शशांक केतकर व्यतिरिक्त या मालिकेत ‘माझा होशील ना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेला अभिनेता आशय कुलकर्णी आणि तन्वी मुंडले हे देखील या मालिकेत असतील. या व्यतिरिक्त अजून कोण कोण कलाकार आहेत हे मात्र अजून समजले नसले तरी लवकरच आपल्याला ते कळेल.
१ मार्च पासून दर सोमवार ते शनिवार रोज रात्री ७ वाजता ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित होईल.