झी मराठीवर शुभांगी गोखले यांची नवी मालिका येत आहे ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीने नुकताच प्रदर्शित केला.
ही मालिका येत्या नव्या वर्षात ४ जानेवारी पासून रोज रात्री ८ वाजता सोमवार ते शनिवार प्रदर्शित होईल. त्यामुळे झी मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे की सध्या झी वर रात्री ८ वाजता चालू असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं नेमकं काय होणार ? गुरुनाथ, राधिका आणि शनाया प्रेक्षकांचा निरोप घेणार की नव्या वेळेत प्रेक्षकांना भेटायला येणार.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शनाया ची भूमिका करणारी रसिका सुनील या मालिकेतून बाहेर पडणार आहे. ती आपल्या आधीच्या प्रियकरासोबत लग्न करून परदेशी स्थायिक झालेली दाखवणार आहेत. पण मालिकेच्या नव्या वेळे संदर्भात किंवा निरोप घेण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
मालिकेची लोकप्रियता पाहता ही मालिका बंद होईल असे वाटत नाही. तरी थोड्याच दिवसात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या भविष्यातल्या वाटचली बद्दल आपल्याला माहीत होईलच.