झी मराठीवर २ नोव्हेंबर पासून एक नवी मालिका सुरू झाली आहे. ‘कारभारी लयभारी’ या नावाची, या मालिकेच कथानक राजकारणाभोवती फिरणारी आहे. ‘लगिर झालं जी’ या सैनिकांच्या आयुष्यवर मालिका बनवलेले लेखक तेजपाल वाघ यांनीच या मालिकेच लेखन केलं आहे तर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत किरण दळवी. तर झी वरील थोड्याच दिवसांपूर्वी सुरू झालेली, डॉक्टरी पेशातील फसवणुकीवर आधारित ‘देवमाणूस’ ह्या मालिकेचे संवाद ज्यांनी लिहले आहेत ते विशाल कदम यांनीच ‘कारभारी लय भारी’ या मालिकेचे संवाद लिहिले आहेत.
या मालिकेच शीर्षक गीत प्रेक्षकांची चांगलंच डोक्यावर घेतलं. पंकज पडघन यांनी या मालिकेच्या शीर्षक गीताला संगीत दिलं असून, देवानंद माळी या शाहिरांनी हे गीत गायलंय, तर सुलोचना चव्हाणांचे चिरंजीव विजय चव्हाण यांनी ह्या गीताची वाद्य वाजवली आहेत.
‘कारभारी लय भारी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाते हि जोडी दिसणार आहे. निखिल चव्हाण म्हणजे ‘लगिर झाली जी’ या मालिकेतील आज्याचा जिवलग मित्र याची भूमिका करून घराघरात पोहोचलेला चेहरा. त्यामुळे निखिल चव्हाण हे आधीपासूनच लोकप्रिय आहेत. ते आता या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसतील. तर अनुष्का सरकाते हा नवीन चेहरा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल.
तेव्हा २ नोव्हेंबरपासून चालू झालेली “कारभारी लय भारी” ही मालिका झी मराठीवर पाहायला विसरु नका. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. प्रक्षेपित होते.