Chandramukhi Marathi Movie| Reviews, Cast, Story

Chandramukhi Marathi Movie Poster

पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर प्रसाद ओकचा नवा सिनेमा - चंद्रमुखी

पानिपत कादंबरी लेखक विश्वास पाटील यांची अजून एक प्रसिद्ध कादंबरी ‘चंद्रमुखी’ २००४ साली प्रदर्शित झाली होती. बॅरिस्टर खासदार दौलत देशमाने एक राजकारणातील मोठं नाव तर दुसरीकडे तमाशातील लावणीसम्राज्ञी चंद्रमुखी. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. त्यांच्या प्रेमकथेवर आधारित चंद्रमुखी ही पुस्तकरूपी कादंबरी आता लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.

नुकतंच प्रसाद ओक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरी वर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा ते दिग्दर्शित करणार असल्याचे सांगितले. अक्षय बर्दपूरकर आणि पियुष सिंह या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमाची पटकथा लिहली आहे. आणि विशेष म्हणजे या सिनेमाच्या संगीत विभागाची धुरा ही महाराष्ट्राची संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अजय-अतुल हे दोघे सांभाळणार असल्याने या सिनेमातील गाणी देखील त्यांच्या इतर सिनेमाच्या गाण्या प्रमाणे लोकप्रियतेचे शिखर गाठतील यात शंका नाही.

सिनेमामध्ये कोण कोण कलाकार आहेत हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. सिनेमाच्या पोस्टर मध्ये चंद्रमुखीची मोहक अदा पाहायला मिळाली आहे. परंतु तिच्या चेहऱ्यावर ओढणी असल्याने ही भूमिका कोण करत आहे हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

तरी फिल्मीगिरी टीम तर्फे आपण प्रसाद ओक आणि त्यांच्या संपूर्ण चंद्रमुखी टीम ला शुभेच्छा देऊयात. आणि चंद्रमुखी कादंबरी प्रमाणेच त्यांचा चंद्रमुखी हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा ही आशा बाळगूयात.

Chandramukhi Movie Cast-

Cast:

Prasad Oak

Directed By:

Prasad Oak

Cinematography By:

Sanjay Memane

Dailouges By:

Chinmay Mandlekar

Music By:

Ajay-Atul

Produced By:

Akshay Bardapurkar, Planet Marathi, Golden Ratio films

Associate Producer:

Mangesh K. Bhalerao

Chandramukhi Release Date

Movie releases in 2021