Jhimma Marathi Movie| Reviews, Cast, Story

Jhimma Movie Poster

हेमंत ढोमे दिग्दर्शित नवा सिनेमा - झिम्मा

‘बघतोस काय मुजरा कर’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या सिनेमांच्या यशा नंतर हरहुन्नरी कलाकार आणि अष्टपैलू दिग्दर्शक हेमंत ढोमे आपल्यासाठी झिम्मा नावाचा नवा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाची निर्मिती हेमंत ढोमे याची पत्नी क्षिती ढोमे आणि अमेय खोपकर करत आहेत.

या सिनेमाची निर्मिती ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट अँड चलचित्र कंपनी’ अंतर्गत होत असून या सिनेमामध्ये सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती ढोमे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हे अभिनय करताना दिसतील.

सिनेमाची कथा ७ विविध वयोगटातील महिलांच्या आयुष्यभोवती फिरते. या सातही महिला वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातील आहेत. सगळ्यां महिलांच्या आपापल्या समस्या आहेत. ग्रेट ब्रिटन मध्ये एका टूर च्या निमित्ताने सगळ्या एकत्र येतात. एकमेकींच्या सहवासाने प्रत्येकीचा आपला स्वतःचा शोध सुरू होतो. आणि स्वतःची नव्याने ओळख व्हायला सुरुवात होते. अशी या सिनेमाची थोडक्यात कथा आहे.

झिम्मा या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाले असून. महाराष्ट्र मधील सिनेमागृह सुरू झाल्यावर लवकरच आपल्याला हा सिनेमा ७० एमएमच्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल अशी आशा ठेवण्यास काही हरकत नाही.

फिल्मीगिरी टीमतर्फे हेमंत ढोमे आणि झिम्माच्या संपूर्ण टीम ला त्यांच्या सिनेमासाठी शुभेच्छा देऊयात.

Jhimma Movie Cast-

Cast:

Sonalee Kulkarni, Sayali Sanjeev, Mrinmayee Godbole, Siddharth Chandekar, Kshitee Jog, Suchitra Bandekar, Nirmiti Sawant, Suhas Joshi

Directed By:

Hemant Dhome, Kshitee Jog

Written By:

Irawati Karnik

Music By:

Amitraj Sawant

Singers:

Suhastai Joshi, Vaishali Samant, Mugdha Karhade, Aarti Devle

Production:

AVK Entertainment

Jhimma Release Date

Movie releases in 2021