मिसेस मुख्यमंत्री या झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची भूमिका निभावल्या नंतर अमृता धोंगडे ची नवी मालिका येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘चांदणे शिंपीत जाशी/Chandane Shimpit Jashi‘.
सोनी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला गेला. एक कॉलेज कुमारी आपले घर सांभाळून गरजेचे काम देखील करते आहे. शिवाय तिच्यावर घरातील दारुडा बाप आणि बेरोजगार भाऊ यांची देखील जबाबदारी आहे. हे या प्रोमो मध्ये दिसतंय. अमृताच्या दारुड्या वडिलांची भूमिका मराठी मधील प्रसिध्द अभिनेते नागेश भोसले यांनी केली आहे त्याच बरोबर भावाच्या भूमिकेत अभिनेता अतुल आगलावे दिसेल.
सोनी मराठीवर २८ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ७:३० वाजता ही मालिका प्रदर्शित केली जाईल. मिसेस मुख्यमंत्री मध्ये साकारलेल्या ठसकेबाज ग्रामीण ढंगातील सुमीला जसे लोकांनी स्वीकारले तसेच अमृताच्या या नव्या मालिकेत देखील लोक तिला स्वीकारतील अशी आशा ठेवून ‘चांदणे शिंपीत जाशी’ या मालिकेच्या टीम ला वाचक आणि फिल्मीगिरी टीम तर्फे शुभेच्छा देऊयात.
लॉकडउन नंतर सिनेमासृष्ठी सावरत असताना असे प्रमोशनचे नवे नवे फंडे इतर सिनेमांसाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्यांना देखील अश्या प्रमोशनच्या नवनव्या कल्पना सुचतील जेणेकरून रसिकांची उत्सुकता ताणली जाईल.
आपण आपल्या फिल्मीगीरी टीम तर्फे ‘मंगलाष्टक रिटर्न्स’ या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देऊयात. आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सिनेमाला रसिकांचा खूप छान प्रतिसाद मिळो ही अपेक्षा ठेवूया.