Luck Down Movie (लक डाऊन) | Reviews, Cast, Story

Luck Down Marathi Movie

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी दोघांचा येतोय नवा सिनेमा - लक डाउन

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला मराठी अभिनेता अंकुश चौधरी आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे. त्या सिनेमाचं नाव आहे लक डाउन/Luck Down. या सिनेमात अंकुश सोबत असेल ती प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीला आपण ‘हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेचं आणि NDTV गुड टाइम्स या वाहिनीवरील ‘मस्त महाराष्ट्र’ या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना छोट्या पडद्यावर पाहत आहोत. आता प्राजक्ता माळीला आपण या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहू शकू.

चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे पार पडला. या प्रसंगी अनेक मोठे पाहुणे उपस्थित होते. माजी आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, गणेश कवाडे, जुन्नरचे नगर अध्यक्ष श्याम पांडे, पीआय युवराज मोहिते हे सगळे उपस्थित होते. सिनेमाचं दिग्दर्शन संतोष रामदास मांजरेकर हे करणार आहेत. सिनेमात अंकुश आणि प्राजक्ता यांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण या सिनेमात आहे हे अजून कळले नसले तरी आनंद इंगळे या सिनेमात या जोडीच्या सोबत अभिनय करतील हे त्यांच्या मुहूर्त प्रसंगी उपस्थिती दर्शवल्याने अधोरेखित होत आहे.

हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरावा ही अपेक्षा ठेवून आपण ‘लक डाउन’ या सिनेमाच्या सर्व टीमला वाचक आणि फिल्मीगिरी टीम तर्फे शुभेच्छा देऊयात.

Luck Down Movie Cast –

Cast:

Prajakta Mali, Ankush Chaudhary, Anand Ingale

Directed By:

Santosh Ramdas Manjrekar

Luck Down Release Date

Movie releases in 2021