व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा (Pinjra) हा अत्यंत गाजलेला सिनेमा. या सिनेमाची गाणी आजही लोकांच्या ओठांवर येतात. श्रीराम लागू यांनी या सिनेमात सरळ साध्य तत्वनिष्ठ अश्या मस्तराची भूमिका केली आहे. तर अभिनेत्री संध्या यांनी या सिनेमात तमाशात नाचणाऱ्या बाईची भूमिका केली आहे. मास्तरांचा गावात तमाशा चालू करायला विरोध आहे. अश्यावेळी तमाशात नाचणारी चंद्रकला (संध्या) शप्पथ घेते की मास्तराला तुणतुणे घेऊन बोर्डावर उभ करेन.
श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळेल.