पावनखिंड हा ऐतिहासिक सिनेमा शिवकालीन प्रसंग बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानावर आधारित आहे. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून विशाळगडावर निघाले तेव्हा सिद्दीच्या पाठलाग करणाऱ्या सैन्याला अडवून धरण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर होती.
हा प्रसंग परत पडद्यावर जिवंत करण्याचं शिवधनुष्य दिगपाल लांजेकर यांनी जंगजोहर या सिनेमाच्या निमित्ताने उचललं आहे. फतेशीकस्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग ज्यामध्ये महाराजांनी पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती. त्या सिनेमात असलेले बरेचसे कलाकार या सिनेमात देखील आपल्याला पाहायला मिळतील.
या सिनेमात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, अंकित मोहन हे कलाकार आहेत.
१० जून २०२१ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.