२०१० साली आलेला नटरंग हा सिनेमा त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. गुना कागलकर (अतुल कुलकर्णी) यांच्या भोवती या सिनेमाची कथा फिरते. गुना तमाशात काम करता करता तमाशाचा फड उभा करायचा प्रयत्न करतो. यामध्ये गरज म्हणून त्याला नाच्या ची भूमिका करावी लागते. त्यामुळे त्याला आयुष्यात बराच संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष काय आहे ते चित्रपटात पाहणे योग्य ठरेल.
अजय-अतुल यांच्या सुमधूर गाण्यांनी नटलेला रवी जाधव दिग्दर्शित आणि अतुल कुलकर्णी, किशोर कदम, प्रिया बेर्डे, सोनाली कुलकर्णी यांनी अभिनय केलेला हा सिनेमा झी5 वर तुम्ही पाहू शकता.