२००९ साली आलेला जोगवा सिनेमा हा समाजातील रूढी आणि अनिष्ट परंपरा पैकी एक अश्या देवाला सोडल्या जाणाऱ्या देवदासी या विषयावर आधारित आहे. सुली (मुक्ता बर्वे) आणि तय्यापा (उपेंद्र लिमये) या दोन व्यक्तिरेखा अश्याच देवाला सोडलेल्या आहेत. त्या समाजाविरुद्ध बंड करून एकत्र येऊन संघर्ष करतात. त्यांच्या संघर्षाची ही कथा आहे.
उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, विनय आपटे, किशोर कदम, प्रिया बेर्डे, स्मिता तांबे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.
राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला जोगवा हा सिनेमा तुम्ही अमेझॉन प्राईम विडिओ वर पाहू शकता.