श्रेयस हा मुंबईतल्या श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा आहे. श्रेयसच्या आई-वडिलांचं एकमेकांशी पटत नाही. अशातच श्रेयसला पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये पाठवले जाते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची गाठ पडते ती कॉलेजचा दादा असलेल्या दिग्याशी. दिग्या उनाड असला तरी मनाने चांगला आहे. दिग्यासोबत अशोक, सॉरी, नितीन, श्रीकांत आदीचं टोळकं आहे. पुढे डीएसपीच्या गँगचा श्रेयसही सदस्य होतो. त्यानंतर शिरीन तिचा भाऊ प्रीतम, सुरेखा, मिनाक्षी अशा सगळ्यांचा ग्रुप होतो. दिग्या-सुरेखाचं ‘सेटिंग’ सुरू असतानाच शिरीन-श्रेयस-मीनाक्षी जुळायला लागलेलं असत. तर दुसरीकडे कॉलेजमधला दिग्याचा दुश्मन असतो तो साई. कथेतली यांची प्रेमप्रकरणं नेमकी कशी वळणं घेतात. श्रेयसचं पुढे काय होतं ? साईनाथ कसा दरवेळी मिठाचा खडा बनतो यांचा अनुभव म्हणजे ‘दुनियादारी’.
संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, नागेश भोसले, रिचा प्रियाली, राजेश भोसले, सुशांत शेलार, अजिंक्य जोशी यांनी भूमिका केल्या आहेत.
सहकुटुंब हा सिनेमा प्राईम विडिओ वर तुम्ही पाहू शकता.