दिग्दर्शक उमेश विनायक कुळकर्णी यांनी सादर केलेल्या या सिनेमाची कथा मंगरूळ गावाची आहे. किश्या हा गावातील एक साधारण तरुण एक दिवस गाय चारायला घेऊन गेलेला असतो. त्याच्या थोडं आधी एक सुतार मोबाईलवरून मापे सांगताना एका औदुंबरच्या झाडावर खाणाखुणा करून ठेवतो. किश्या त्या झाडावरील खाणाखुणा पाहतो. त्याला त्यामध्ये दत्ताच रूप दिसत. गावातील लोकांना तो ते दाखवतो आणि गावकरी देखील त्यातून दत्तरुपाचा आकार शोधतात.
गावातील राजकारणी भाऊ, आप्पा, पत्रकार व त्यांचे एक दोघे मित्र याचा फायदा घेऊन दत्त अवतरल्याची बातमी छापतात. पुढे गावाला तीर्थक्षेत्र बनवण्याचा घाट घातला जातो. त्यात कश्या गमतीजमती घडतात हे या सिनेमात पाहायला मिळेल.
गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत नासिरुद्दीन शाह.
प्राईम विडिओ वर हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब पाहू शकता.