अमोल पालेकर दिग्दर्शित बनगरवाडी हा १९९५ साली आलेला ग्रामीण भागातील मागासलेपणा गुन्हेगारी यावर भाष्य करणारा आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे एक शिक्षक आहेत जे अश्या गरीब, शेतकरी आणि गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या गावात शिक्षक म्हणून जातात आणि त्या लोकांना शिकवता शिकवता त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात.
चंद्रकांत कुलकर्णी, उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.