१९७९ साली आलेला अष्टविनायक हा चित्रपट त्या वेळीचा एक गाजलेला सिनेमा. या सिनेमाची सगळीच गाणी सुंदर होती. आजही गणेशोत्सवात अष्टविनायक सिनेमातील गाणी लावली जातात.
सिनेमाचा नायक एक श्रीमंत घरातील मुलगा आहे. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतो आहे. पण तो नास्तिक आहे. त्याच लग्न एका मध्यमवर्गीय आस्तिक मुलीसोबत होतं. पुढे हा नायक आस्तिक होतो का ? त्या दोघांच्या आयुष्यात अजून काय काय घडतं. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.
राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सचिन पिळगावकर, माधव अवचाल, रमेश भाटकर, सुहास भालेकर, पांडुरंग बेणारे यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.