Mee Vasantrao Marathi Movie | Reviews, Cast, Story

Mee Vasantrao Poster

वसंतराव देशपांडे यांची बायोपिक - मी वसंतराव

नाट्यसंगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे वसंतराव देशपांडे. नाट्यसंगीतासोबतच त्यांनी पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार या सिनेमांसाठी पाश्वगायन देखील केलं. ३० जुलै १९८३ साली वसंतराव देशपांडे यांचे निधन झाले. पण त्यांनी गायलेली गाणी आजही अजरामर आहेत.

निपुण धर्माधिकारी हा एक तरुण दिग्दर्शक वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी वसंतराव’ या नावाचा एक सिनेमा आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका प्रारंभीच्या आयुष्यात अमेय वाघ आणि उत्तरार्धात राहुल देशपांडे यांनी केली आहे. उत्सुकतेची गोष्ट म्हणजे राहुल देशपांडे हे वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत.

राहुल देशपांडे आणि अमेय वाघ यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात आपल्याला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम राधिका म्हणजेच अनिता दाते, कौमिदी वालोकर, अरुष नाद (लहानपणीच्या वसंतराव यांच्या भूमिकेत), तसेच दिल दोस्ती दुनियादारी या प्रसिध्द मालिकेतील आशु म्हणजे पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार देखील दिसतील.

हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याची तारीख अजून जाहीर झाली नाही. तरी संगीताची मेजवानी घेऊन हा सिनेमा लवकर प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षा ठेवुयात आणि ‘मी वसंतराव’ या सिनेमाच्या कलाकार आणि टीम ला शुभेच्छा देऊयात.

Mee Vasantrao Movie Cast-

Cast:

Rahul Deshpande (Vasantrao Deshpande), Amey Wagh, Anita Date, Arush Nand (Childhood role of Sir Vasantrao Deshpande), Kaumudi Walokar, Pushkaraj Chirputkar

Written By:

Nipun Dharmadhikari, Upendra Sidhaye

Produced By:

Darshan Desai, Chandrashekhar Gokhale, Ranjit Gugle, Niranjan Kirloskar

Directed By:

Nipun Dharmadhikari

Mee Vasantrao Release Date

Movie releases in 2021