Colorful Marathi Movie| Reviews, Cast, Story (colorफुल)

Colorful movie poster

दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा नवा सिनेमा - कलरफुल

मराठी प्रेक्षकांना प्रकाश कुंटे हे नाव काही नवीन नाही. त्यांनी मराठी सिनेमात काही वेगळे विषय घेऊन केलेल्या कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘कॉफी आणि बरंच काही’ ‘जरा हटके’ ‘हंपी’ आणि ‘सायकल’ या सारखे हटके म्हणता येतील असे चित्रपट त्यांनी बनवले.

आता ते मराठी सिनेरसिकांसाठी नवी कलाकृती घेऊन येत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ‘कलरफुल’. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टर पाहून तरी ही एक रोमँटिक लवस्टोरी आहे असं निदर्शनास येत आहे. प्रेमी युगुल एका नयनरम्य ठिकाणी पाठमोरे बसले आहेत असे या पोस्टर मध्ये दाखवण्यात आले आहे.

सिनेमामध्ये सई ताम्हणकर अणि ललित प्रभाकर एकत्र पाहायला मिळणार आहेत आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सगळं अजून गुलदस्त्यात असलं तरी लवकरच ते कळेल अशी शक्यता आहे.

लॉकडाऊन नंतर हळूहळू सगळं पूर्वपदावर येत आहे. चित्रपटगृह खुले होत आहेत. तेव्हा लवकरच नवे सिनेमे आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळतील आणि कलरफुल हा सिनेमा देखील लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल अशी आशा करूयात आणि कलरफुल सिनेमाच्या टीम ला शुभेच्छा देऊयात.

Colorful Movie Cast –

Cast:

Sai Tamhankar, Lalit Prabhakar

Produced By:

Maansi Sengupta

Directed By:

Prakash Kunte

Written By:

Yugandhar Deshpande

Present By:

Yantra Pictures

Supervising Producer

Rahul Bhosale

Music

Avadhoot Gupte

DOP

Rahul Janardan Jadhav

Colorful Release Date

Movie releases in 2021

Hashtags

#colorphool, #colorful, #ColorfulPosterOut, #colorफुल