Luv U Mitra Marathi Movie | Reviews, Cast, Story

Luv U Mitra Marathi Movie Poster

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांचा नवा सिनेमा :- 'लव यु मित्रा'

या वर्षी मराठी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत आणि लाडका आणि देखणा अभिनेता गश्मीर महाजनी या दोघांचा एक सिनेमा भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘लव यु मित्रा’ नुकतंच पूजा सावंतने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या सिनेमा विषयी माहिती दिली, या मध्ये तिने म्हंटल आहे की ‘मित्र ही एक अशी व्यक्ती असते, जी कायम आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते’.

छोट्या पडद्यावर ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या माध्यमातून सोनी मराठीवर पूजा सावंत परीक्षकाच्या भूमिकेत आपल्यला भेटत असतेच, तेव्हा या सिनेमाच्या रूपाने ती आपल्याला आता मोठ्या पडद्यावर देखील लवकरच दिसेल.

सिद्धार्थ साळवी यांनी लिहलेला हा सिनेमा मानसी बागला यांनी दिग्दर्शित केलेला आहे, तर वरून बागला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत व्यतिरिक्त अजून कोण कलाकार या सिनेमात आहे ही बाब अजूनतरी गुलदस्त्यात आहे. तरी लवकरच ‘लव यु मित्रा’ हा सिनेमा प्रदर्शित व्हावा आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला ही फिल्मीगीरी टीम तर्फे आशा व्यक्त करूयात.

Luv U Mitra Movie Cast-

Cast: Pooja Sawant, Gashmeer Mahajani

Directed By: Mansi Bagla

Produced By: Varun Bagla

Written By: Siddharth Salvi

Luv U Mitra Release Date

Movie releases in 2021