दिगपाल लांजेकर दिग्दर्शित एक नवा सिनेमा जंगजोहर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा ऐतिहासिक सिनेमा शिवकालीन प्रसंग बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानावर आधारित आहे. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून विशाळगडावर निघाले तेव्हा सिद्दीच्या पाठलाग करणाऱ्या सैन्याला अडवून धरण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर होती.
हा प्रसंग परत पडद्यावर जिवंत करण्याचं शिवधनुष्य दिगपाल लांजेकर यांनी जंगजोहर या सिनेमाच्या निमित्ताने उचललं आहे. फतेशीकस्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग ज्यामध्ये महाराजांनी पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती. त्या सिनेमात असलेले बरेचसे कलाकार या सिनेमात देखील आपल्याला पाहायला मिळतील.
या सिनेमात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, अंकित मोहन हे कलाकार आहेत. फतेशीकस्त सिनेमात लाल महाल मधील घडलेल्या घटनेचा बारीकसारीक गोष्टींचा अतिशय बारकाईने अभ्यास करून चित्रपट बनवला गेला होता. हे चित्रपट पाहताना जाणवत होतं. त्या सिनेमाचं दिग्दर्शन देखील दिगपाल लांजेकर यांनीच केलं होतं. आणि या जंगजोहर सिनेमाचं दिग्दर्शन देखील दिगपाल लांजेकर यांनीच केलं आहे. त्यामुळे बाजीप्रभू देशपांडे यांचं शौर्य पडद्यावर पाहताना देखील आपल्याला अश्याच बारीकसारीक गोष्टी. सिद्दीच्या तावडीतून निसटत असताना महाराजांनी केलेला अभ्यास. याचं दर्शन आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल अशी आशा करूयात.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झाली नसली तरी अनलॉक नंतर लवकरच हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा करूयात
आणि जंगजोहर टीमला चांगलं यश मिळो या शुभेच्छा