सोनी मराठीवर ११ नोव्हेंबर पासून रोज रात्री १० वाजता ‘जिगरबाज’ ही नवी मालिका प्रक्षेपित केली जात असून या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार आपल्याला काम करताना दिसतील. मराठी मधील जेष्ठ कलाकार माझ्या नवऱ्याची बायको मधील नाना अरुण नलावडे शिवाय सह्याद्री वर मैलाचा दगड ठरलेली मालिका शिवाय बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी या मालिकेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल.
या मालिकेत डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील भावविश्व आपल्या समोर उलगडण्यात येईल. त्यामुळे नेहमीच्या कथानकापेक्षा हे कथानक निश्चितपणे वेगळे असेल यात शंका नाही.
या दोन दिग्गज कलाकारांसोबत ट्रिपल सीट सिनेमात आपल्याला दिसलेली अभिनेत्री पल्लवी पाटील आणि स्वराज्य जननी जिजामाता या सोनी वरील मालिकेत जजमातांची भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता पवार देखील आपल्याला या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.
मालिकाचे वेगळे कथानक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल यात शंका नाही. तेव्हा फिल्मीगिरीच्या टीम तर्फे जिगरबाज मालिकेला आपण शुभेच्छा देऊयात.