जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला अजून एक मास्टरपीस म्हणजे उंबरठा.
सुमित्रा महाजन (स्मिता पाटील) चे लग्न पेशाने वकील असलेल्या सुभाष (गिरीश कर्नाड) सोबत होते. सुमित्राने मुंबईच्या सोशल वर्कमध्ये डिप्लोमा केलेला आहे. यानंतर ती संगमवाडी गावात महिला सुधारगृहात सुपरिटेंडेट पदाची नोकरी करण्यासाठी जाते. तिला एक मुलगी आहे. पण पती सुभाष त्या मुलीला सोबत घेऊन जाऊ देत नाही म्हणून सुमित्रा आपल्या मुलीला नंदेच्या भरवश्यावर मुलीला सोडून जाते. पुढे बरंचस नाट्य या सिनेमात घडतं जे या सिनेमात पाहणं योग्य ठरेल.
स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, श्रीकांत मोघे, आशालता यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा युट्युब वर तुम्ही पाहू शकता.