जैत रे जैत (Jait Re Jait) चित्रपटाची कथा आदिवासी जातीच्या ठाकर समाजा भोवती फिरते. नाग्या (मोहन आगाशे) हा या सिनेमाचा नायक आहे. त्यांची भेट चिंधी (स्मिता पाटील) सोबत होते. तीने आपल्या पतीला सोडलं आहे. ते दोघेही प्रेमात पडतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. एकदा नाग्या लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असताना, एक राणी मधमाशी त्याच्यावर हल्ला करते आणि त्याचा एक डोळा जखमी झाला आहे. तो सूड घेण्याचा निर्णय घेतो.
नाग्या सूड घेण्यात यशस्वी होतो का ? चिंधी त्याला कशी मदत करते. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा सिनेमा पाहून मिळतील
स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले यांच्या दमदार अभिनयाने नटलेला जब्बार पटेल दिग्दर्शित हा सिनेमा युट्युब वर तुम्ही पाहू शकता.