स्वातंत्र्यपूर्व काळातली गमतीदार कथा आहे. संबळगड नावाच्या एका छोट्या गावात पोस्टात कारकून असलेले वामनराव अष्टपुत्रे राहतात. त्यांचा स्वभाव साधा आणि घाबरट आहे. इंग्रजी राजवटीचे चटके हे गाव सहन करतंय. क्रांतिकारी गनिमी पद्धतीने इंग्रजांसोबत लढतायत. अष्टपुत्रेंनाही देशासाठी काही तरी करायचंय. फक्त काय करावं ते त्यांना कळत नाहीये. याच वेळी अनपेक्षितपणे एक जबाबदारी वामनरावांवर येऊ पडते.
ही जबाबदारी ते पार पाडतात, ते पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल.
सुमित राघवन, भार्गवी चिरमुले, शरद पोंक्षे, शंतनू गंगणे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे, ब्रँडॉन हिल, दिवेश मेदगे यांनी अभिनय केलेला हा सिनेमा अतुल काळे यांनी दिग्दर्शित केला आहे.
प्राईम विडिओ वर सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.