सध्या मराठीचा आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आपल्या रसिक प्रेक्षकांना एका नव्या सिनेमाची मेजवानी घेऊन आले आहेत. आणि हो, हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावे लागणार नाही, तर हा सिनेमा तुम्ही घरबसल्या 'अमेझॉन प्राईम' वर पाहू शकता. हा सिनेमा आहे 'पिकासो'
हा सिनेमा अभिजित मोहन वारंग यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर शिलादत्त बोरा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक सोबत समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गावकर, नीलकंठ सावंत हे कलाकार असतील. आनंद लुनकड यांनी या सिनेमाला संगीत दिल आहे.
महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील दुर्गम खेड्यातील गंधर्व पांडुरग गावडे या सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांची पिकासो कला शिष्यवृत्तीच्या राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतील विजेत्यास स्पेन - पिकासोचे जन्मस्थान आहे तिथे जाण्याची संधी मिळणार आहे. गंधर्व त्याच्या निवडीबद्दल पालकांना माहिती देतो आणि स्पर्धेच्या पुढील स्तरावर जाण्यासाठी फी भरण्याची आवश्यकता असते - परंतु पालकांना ते परवडनारे नसते.
यातून मार्ग निघतो का ? गंधर्व स्पेन ला जाण्यात यशस्वी होतो का ? हे समजण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल