आजपर्यंत अनेक चित्रपटातून छत्रपती शिवरायांचे दर्शन आपल्याला मोठ्या पडद्यावर घडले. त्यात अफझलखान वध देखील काही सिनेमांमधून आपल्याला पाहायला मिळाला. पण ‘शेर शिवराज है’ या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत दिग्पाल लांजेकर. या आधी दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांच्या जीवनावर काही महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत सिनेमे बनवले आहेत,
फतेशिकस्त, फर्जंद या सारखे सिनेमे त्यांनी याआधी ही बनवलेले आहेत. आणि या सिनेमांना सिनेरसिकांनी देखील छान प्रतिसाद दिला होता. अजून एक सिनेमा ‘जंगजौहर‘ लॉकडॉऊन मुळे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
त्यांच्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एका एका छोट्या प्रसंगाचा केलेला अभ्यास. आणि पडद्यावर केलेली त्याची मांडणी. हे दिग्पाल लांजेकर यांच्या सिनेमाचे वेगळेपण असते. असेच वेगळेपण आणि छोटे छोटे संदर्भ आपल्याला या ‘शेर शिवराज है’ या सिनेमात देखील पहायला मिळतील अशी आशा करूयात. आणि ‘शेर शिवराज है’ या सिनेमाच्या टीमला आपण फिल्मीगीरीच्या वाचकांतर्फे शुभेच्छा देऊयात