वडीलांच्या निधनानंतर अकरा वर्षाच्या सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला त्याच्या आईची पुणे सारख्या मोठ्या शहरातून एका लहान गावी बदली झाल्यानंतर नवीन शाळेत प्रवेश मिळतो. बदललेल्या परिस्थितीसोबत तो कसा जुळवून घेतो, आलेल्या समस्यांचा तो कसा सामना करतो याविषयी ही कथा आहे.
चित्रपटात आपल्याला दिसतो तो किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला आहे. जयगड लाईटहाउस आणि सामान्य चित्रीकरण या जिल्ह्यातील खेड्यामध्ये झालेलं आहे. सायकलिंगसाठीचे रेसिंग ट्रॅक गणपतीपुळे जवळ आहे.
चित्रपटात आर्किट देवधर, पार्थ भालेराव,गौरीश गावडे, अथर्व उपासनी, अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अविनाश अरुण यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे, सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्स वर पाहू शकता.