एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात, या सात आत्महत्यांचा वैशिष्ट्य म्हणजे या सातही आत्महत्या दरवर्षी श्रावण महिन्यात झाल्या आहेत, यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे, आणि या साक्षीदारांकडे एकाच प्रकारची माहिती आहे.
ही केस सोडवण्यासाठी मुंबईतून हुशार पोलीस अधिकारी अदिती देशमुखला (स्मिता तांबे) पाचारण केले जाते. मग अदिती देशमुख या केसचा पाठपुरावा कसा करतात या विषयी या सिनेमाची कथा आहे.
स्मिता तांबे सोबत या सिनेमात श्वेतांबरी घुटे, मिलिंद शिरोळे, शितान्शु शरद हे कलाकार आहेत. सौरभ सिन्हा यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे
नेटफ्लिक्स वर हा सिनेमा तुम्ही कुटूंबासोबत पाहू शकता.