राम (अतुल कुलकर्णी) हा एक लेखक आहे. पोटापाण्यासाठी तो दक्षिणी सिनेमांचे मराठीत अनुवाद करतो. त्याचं आणि रागिणीचं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. रागिणीला नको असलेलं हे नातं राम ला हवं आहे. हे नातं तुटू नये असं रामला मनोमन वाटतं. पण, म्हणून तो आपली मतं समोरच्यावर लादत नाही. रामचा लेखनाचा व्याप बराच आहे. खूप कामं एकसाथ घेतल्याने आता त्याला ती पूर्ण करण्यासाठी एका सहायकाची गरज आहे. त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळ्या वातावरणात राहिलेली.वेगळ्या विचारांची अशी सोनल त्याला सहायक म्हणून भेटते. घटस्फोटाचा सामायिक धागा दोघांमध्ये समान आहे. त्यानंतर राम, रागिणी, सोनल आणि समित या चौघांच्या गोष्टीला सुरुवात होते. जी या सिनेमात दाखवली गेली आहे.
सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, रोहिणी हट्टंगडी, सुलेखा तळवलकर, मीरा वेलणकर, अजय पूरकर यांनी अभिनय केला आहे. स्वतः सतीश राजवाडे देखील या सिनेमात छोट्या भूमिकेत आहेत.
प्राईम विडिओ वर तुम्ही हा सिनेमा सहकुटुंब पाहू शकता.