१९७५ साली आलेला पांडू हवालदार हा दादा कोंडके यांचा सुपरहिट सिनेमा. एक इमानदार पोलिस हवालदार जो इमानेइतबारे आपलं काम करत असतो पण त्याचे सहकारी मात्र त्याच्या एकदम उलट, लोकांकडून लाच घेणारे या विषयावर गुंफलेली कथा. या सिनेमात दादा कोंडके यांच्या विनोदाचा टच तुम्हाला पाहायला मिळेल.
या सिनेमाचं दिग्दर्शन दादा कोंडके यांनी स्वतः केलं आहे. तर सिनेमात दादा कोंडके, लता अरुण, रुही बेर्डे, उषा चव्हाण आणि स्वतः दादा कोंडके यांनी अभिनय केला आहे.